नको देवराया
Wednesday, 15 July 2009
साहित्य-कान्होपात्रा
नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे ॥
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥१॥
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई ॥२॥
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥३॥
1 comments:
भक्ताची आत्यंतिक करुणावष दशा... ह्यापेक्षा इतर कोठल्या शब्दांमध्ये वर्णन होऊ शकत नाही. भक्ताची आत्यंतिकता... कळकळ...तळमळ जी शब्दांच्या पलिकडची आहे ती किती मोजक्याच शब्दात परिपूर्णरितीने येथे उतरली आहे. धन्यवाद... सप्रेम.
Post a Comment