Pages

Showing posts with label अभंग. Show all posts
Showing posts with label अभंग. Show all posts

विठ्ठल गीती गावा

Tuesday, 6 May 2014

साहित्य-तुकाराम


विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ति ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥

अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधु ।
तोडी भवबंधु यम पाश ॥१॥

तोची शरणागता विठ्ठल मुक्ति दाता ।
विठ्ठल हा संता समागमे ॥२॥

विठ्ठल गुण निधी विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधी विठ्ठल नामे ॥३॥

विठ्ठलाचे नाव घेता झाले सुख ।
गोडावले मुख तुका म्हणे ॥४॥

Pandit Bhimsen Joshi performs :

Read more...

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

Tuesday, 4 February 2014

साहित्य-नामदेव
संगीत-राम फाटक
स्वर-भीमसेन जोशी
राग-अल्हैय्याबिलावल , आसावरी , जोगिया


तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥

Read more...

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

Saturday, 8 June 2013

साहित्य-नामदेव


पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥

भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचन काय लाज ॥१॥

मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण आली धाड ॥२॥

वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा म्हणे नामा ॥३॥

Read more...

याचसाठी केला होता अट्टहास

Saturday, 5 March 2011

साहित्य-तुकाराम


याचसाठी केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥

आता निश्चिंतीने पावलो विसावा ।
खुंटलिया धावा तृष्णेचिया॥१॥

कव तुकवाटे जालिया वेचाचे ।
नाव मंगलाचे तेने गुणे ॥२॥

तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी ।
आता दिस चारी खेळी मेळी ॥३॥

Read more...

नको देवराया

Wednesday, 15 July 2009

साहित्य-कान्होपात्रा


नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे ॥

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥१॥

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई ॥२॥

मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥३॥

Read more...

राजस सुकुमार

साहित्य-तुकाराम


राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥॥

कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥१॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥

कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

Read more...

जातां पंढरीसी

साहित्य-सेना महाराज


जातां पंढरीसी सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥

सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

Read more...

माझे माहेर पंढरी

Friday, 10 July 2009

साहित्य-एकनाथ


माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ॥

बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥१॥
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू ॥२॥
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पाप भंगा ॥३॥
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ॥४॥

Read more...

Popular Posts