Pages

Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

हे सुरानो, चंद्र व्हा

Tuesday, 29 January 2019

कुसुमाग्रज
संगीत-जितेंद्र अभिषेकी,
स्वर-जितेंद्र अभिषेकी
राग-चारुकेशी
नाटक - ययाति आणि देवयानी


हे सुरांनो, चंद्र व्हा,
चांदण्याचे कोष माझ्या,
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकि तमाची,
हरवलेल्या मानसाची,
बरसुनी आकाश सारे,
अमृताने नाहवा ॥१॥

Read more...

मृगनयना रसिक मोहिनी

Wednesday, 1 February 2017

साहित्य-गोविंद बल्लाळ देवल
संगीत-गोविंद बल्लाळ देवल
स्वर-वसंतराव देशपांडे
राग-दरबारी कानडा
नाटक - संशयकल्लोळ


मृगनयना रसिक मोहिनी ।
कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी ॥

नवयौवनसंपन्‍न रम्य गतिविलासिनी ॥१॥

आह्लादक मुखचंद्रहि होता ।
होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥२॥

Read more...

विठ्ठल गीती गावा

Tuesday, 6 May 2014

साहित्य-तुकाराम


विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ति ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥

अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधु ।
तोडी भवबंधु यम पाश ॥१॥

तोची शरणागता विठ्ठल मुक्ति दाता ।
विठ्ठल हा संता समागमे ॥२॥

विठ्ठल गुण निधी विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधी विठ्ठल नामे ॥३॥

विठ्ठलाचे नाव घेता झाले सुख ।
गोडावले मुख तुका म्हणे ॥४॥

Pandit Bhimsen Joshi performs :

Read more...

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

Tuesday, 4 February 2014

साहित्य-नामदेव
संगीत-राम फाटक
स्वर-भीमसेन जोशी
राग-अल्हैय्याबिलावल , आसावरी , जोगिया


तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥

Read more...

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

Saturday, 8 June 2013

साहित्य-नामदेव


पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥

भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचन काय लाज ॥१॥

मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण आली धाड ॥२॥

वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा म्हणे नामा ॥३॥

Read more...

याचसाठी केला होता अट्टहास

Saturday, 5 March 2011

साहित्य-तुकाराम


याचसाठी केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥

आता निश्चिंतीने पावलो विसावा ।
खुंटलिया धावा तृष्णेचिया॥१॥

कव तुकवाटे जालिया वेचाचे ।
नाव मंगलाचे तेने गुणे ॥२॥

तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी ।
आता दिस चारी खेळी मेळी ॥३॥

Read more...

घेई छंद मकरंद

Monday, 29 November 2010

साहित्य - पुरुषोत्तम दारव्हेकर
राग  - भीमपालासी (द्रुत तीनताल)
      सालगवराली (मध्यलय झपताल)
गायक - वसंतराव देशपांडे (द्रुत)
       जितेंद्र अभिषेकी (मध्यलय)
नाटक - कट्यार काळजात घुसली

घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद ।
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद ॥

मिटता कमलदल होई बंदी भृंग ।
तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग ॥१॥

बिसतंतू मृदु होति जणु व्रजबंध ।
स्वरब्रम्ह आनंद ! स्वर हो सुगंध ॥२॥

Read more...

ये रे घना, ये रे घना

Friday, 8 October 2010

साहित्य-आरती प्रभू


ये रे घना, ये रे घना ।
न्हाउ घाल माझ्या मना ॥

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ॥१॥

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार ।
नको नको म्हणताना, मनमोर भर राना ॥२॥

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू ।
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना ॥३॥

Read more...

तरुण आहे रात्र अजूनि

Wednesday, 30 June 2010

साहित्य-सुरेश भट
गायन - आशा भोंसले


तरुण आहे रात्र अजूनि, राजसा, निजलास का रे? ।
एवढयातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे? ॥

अजूनही विझल्या न गगनी तारकांचा दीपमाला ।
अजून मी विझले कुठे रे? हाय, तू विझलास का रे? ॥१॥

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू? ।
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे? ॥२॥

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे? ॥३॥

उसळती ह्रदयात माझ्या अमृताचा धुंद लाटा ।
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे? ॥४॥

ओठ अजूनि बंद का रे? श्वास ही मधुमंद का रे? ।
बोल शेजेच्या फुलावर तू असा रुसलास का रे? ॥५॥

The night is still young; (my) Prince, why did you fall asleep?
Why did you (in your sleep) turn away from me so soon?

The garland of stars in the sky haven't been extinguished yet
Have I been doused yet? Alas, why have you smouldered?

Tell me, what shall I tell this autumn moon? (कोजागिरी=Sharad Poornima)
Here my desires are blooming; why have you withered away?

Look, the cold westerly winds are asking you,
Have you looted all the fragrance away from the Night-blooming Jasmine? (Cestrum nocturnum)

A faint elixir is churning out in my heart's ocean (reference to Samudra Manthan)
Why do you remain frigid like the shore ?

Are your lips still sealed ? Why is your breath faint?
Lying on (this) bed of flowers, tell me why are you cross (with me) ?

Read more...

सुखकर्ता दुःखहर्ता

Saturday, 22 August 2009

जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती,
दर्शन मात्रे मन कामना पुर्ती ॥

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची,
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची,
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा,
चंदनाची उटि कुंकुमकेशरा,
हीरेजडित मुकुट शोभतो बरा,
रुणझुणती नुपुरी रुणझुणती नुपुरी चरणी घागरीया ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवर बंधना,
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना,
दासरामाचा वट पाहे सदना,
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ॥३॥

Read more...

नको देवराया

Wednesday, 15 July 2009

साहित्य-कान्होपात्रा


नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे ॥

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥१॥

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई ॥२॥

मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥३॥

Read more...

राजस सुकुमार

साहित्य-तुकाराम


राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥॥

कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥१॥

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥

कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

Read more...

जातां पंढरीसी

साहित्य-सेना महाराज


जातां पंढरीसी सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥

सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

Read more...

शुक्रतारा, मंद वारा

Friday, 10 July 2009

साहित्य-मंगेश पाडगावकर


शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥

मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा ॥१॥

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा ॥२॥

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा ॥३॥

Read more...

संधीकाली या आशा

साहित्य-गंगाधर महांबरे


संधीकाली या आशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येइ अंबरी ।
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया, प्रीत होइ बावरी ॥

मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, एकरूप संगमी
रातराणीच्यामुळे, श्वास धुंद परिमळे, फुलत प्रीतिची फुले
प्रणयगीत हे असे, कानि ऐकू येतसे, गीती शब्द ना जरी ॥१॥

सांजरंगी रंगुनी, न कळताच दंगुनी, हृदयतार छेडुनी
युगुलगीत गाउनी, एकरूप हो‍उनी, देउ प्रीत दावुनी
प्रणायचित्र हे दिसे, रंगसंगती ठसे, कुंचला नसे जरी ॥२॥

Read more...

मी डोलकर

साहित्य-शांता शेळके


वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा ।

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा
घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा ॥

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा
नथ नाकात साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाऱ्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा ॥१॥

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा
कवा उदानवारा शिराला येतंय्‌ फारू
कवा पान्यासुनी आबाला भिरतंय तारू
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय्‌ भरती
जाते पान्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा ॥२॥

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशि चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात व्होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा ॥३॥

Read more...

चांदण्यात फिरताना

साहित्य-सुरेश भट


चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ।
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात ॥

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर
तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥

Read more...

माझे माहेर पंढरी

साहित्य-एकनाथ


माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ॥

बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥१॥
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू ॥२॥
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पाप भंगा ॥३॥
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ॥४॥

Read more...

Popular Posts