चांदण्यात फिरताना
Friday, 10 July 2009
साहित्य-सुरेश भट
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ।
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात ॥
निजलेल्या गावातुन आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥
सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥
0 comments:
Post a Comment