Pages

मी डोलकर

Friday 10 July 2009

साहित्य-शांता शेळके


वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा ।

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा
घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा ॥

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा
नथ नाकात साजीरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलिवाऱ्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा ॥१॥

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा
कवा उदानवारा शिराला येतंय्‌ फारू
कवा पान्यासुनी आबाला भिरतंय तारू
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय्‌ भरती
जाते पान्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा ॥२॥

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतं दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदनं प्याली
कशि चांदीची मासली झाली
माज्या जाल्यात व्होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा ॥३॥

0 comments:

Popular Posts